आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडको मालामाल:एन-2, विठ्ठलनगरात 97 चौरस फुटांचा टपरी भूखंड 11 लाखांना,  58 भूखंडांतून सुमारे 17 कोटी 50 लाखांची कमाई

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको एन-२ विठ्ठलनगर येथील ७१ टपरी भूखंड निविदा पद्धतीने विक्रीसाठी काढण्यात आले. यात ९७ चौरस फुटांच्या एका भूखंडाला १ लाख ३३ हजार रुपये एवढा सर्वाधिक भाव मिळाला. त्यामुळे या भूखंडातून सुमारे ११ लाखांची कमाई होईल. ४९ जागांसाठी अपेक्षित किमतीपेक्षा जास्त रकमेच्या निविदा आल्या. त्यामुळे सिडको प्रशासनाला महिनाभरात ४४१० चौरस फूट जागेचे २ कोटी ९० लाख ४२ हजार ६०० रुपये मिळतील.

२५ जुलै ते १२ ऑगस्टपर्यंत भूखंडांच्या माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आल्या. १८ ऑगस्ट रोजी निविदा उघडण्यात आल्या. एन-२, पी-३ सेक्टर, विठ्ठलनगर येथे ९ चौरस मीटर क्षेत्रफळाचे एकूण ७१ टपरी भूखंड विक्रीसाठी उपलब्ध होते. त्यासाठी १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत १५९ निविदा आल्या. १८ रोजी सिडको कार्यालयात मुख्य प्रशासक दीपा मुधोळ - मुंडे, उपजिल्हाधिकारी - प्रशासक सोहम वायाळ, सहायक पणन अधिकारी गजानन साटोटे, क्षेत्रा‌धिकारी स्वाती पाटील, प्रियदर्शिनी सरकटे यांच्या उपस्थितीत निविदाधारकांसमोर निविदांची पाकिटे उघडण्यात आली. सर्वाधिक रक्कम देण्यास तयार असलेल्यांना महिनाभरात ताबा मिळू शकतो, तर सिडको प्रशासनाला अपेक्षित किंमत न मिळालेल्या २२ भूखंडांसाठी पुढील महिन्यात पुन्हा जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.

वाळूजमध्ये ९ जागांतून १४ कोटी ६५ लाख दरम्यान, वाळूज महानगरातील सिडकोच्या निवासी, व्यापारी भूखंड विक्रीसही जोरदार प्रतिसाद मिळाला. येथे १ ते १७ ऑगस्ट या कालावधीत भूखंडाची माहिती देणाऱ्या पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सिडको वाळूज महानगर -४ मधील एकूण ४६ निवासी, व्यापारी भूखंडांसाठी १३ निविदा १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आल्या. त्या १९ रोजी उघडण्यात आल्या. मात्र, ९ भूखंडांसाठीच सिडको प्रशासनाला अपेक्षित असलेल्या रकमेच्यावरील निविदा आल्या होत्या. ९ भूखंडांतून १४ कोटी ६५ लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे. उपजिल्हाधिकारी, प्रशासक सोहम वायाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार येथे ६७५० चौरस मीटरच्या एका भूखंडासाठी सर्वाधिक ३२ हजार १९५ रुपये भाव मिळाला.

बातम्या आणखी आहेत...