आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाळूजमहानगर:मंदिरात दर्शनासाठी जात होत्या 97 वर्षीय आजी, ट्रकच्या धडकेत जागीच झाला मृत्यू, ट्रकने 20 फूट फरफटत नेले

वाळूजमहानगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रकचालक मदत न करताच ट्रक सोडून घटनास्थळावरून पसार झाला

औद्योगिक रहिवासी परिसरातील बजाजनगर येथील आरएच-१२३ येथील जय बजरंग हौसिंग सोसायटीत राहणाऱ्या अनुसया आत्माराम जाधव (९७) या महिलेला भरधाव ट्रकने धडक दिली. या धडकेत महिला ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना २९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास बीएसएनएल गोडाऊन ते दक्षिणमुखी हनुमान मंदिर मार्गावर घडली. विशेष म्हणजे ट्रकच्या मागील चाकाखाली आलेल्या महिलेला ट्रकने तब्बल १५ ते २० फूट लांब फरफटत नेले त्यानंतर नागरिकांनी आरडाओरडा केल्याने ट्रकचालक मदत न करताच ट्रक सोडून घटनास्थळावरून पसार झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, ९७ वर्षीय अनुसया ही वृध्द महिला नित्यनेमाने दररोज सकाळी घरालगत असणाऱ्या हनुमान मंदिरात दर्शनासाठी जातात. २९ जानेवारी रोजीसुद्धा सकाळचा नाश्ता आटोपून त्या देवदर्शनासाठी सकाळी १० च्या सुमारास घराबाहेर पडल्या घरापासून शंभर मीटर अंतरावर अंतर्गत मुख्य रस्तावर जाताच पाठीमागून आलेल्या ट्रकने (एमएच ०९, एजी ६६६९) महिलेला धक्का दिला. यानंतर महिला ट्रकच्या मागील चाकाखाली सापडली. एकाला लागूनच असणाऱ्या दोन टायरच्या गॅपमध्ये महिला सापडल्याने पुढे दूरवर ट्रकसह महिला फरफटत गेली. याच वेळी परिसरातील नागरिकांनी एकच आरडाओरड केल्याने चालकाने काही अंतरावर ट्रक उभा केला. मात्र, नागरिक चोप देतील या भीतीने मदत न करताच चालक घटनास्थळावरून ट्रक सोडून पसार झाला.

पोलिसांनी घेतली धाव घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव, सहाय्यक फौजदार सोनाजी बुट्टे, आरडी वडगावकर यांच्यासह वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गवळी, रामेश्वर कवडे तसेच पोलीस मित्र मनोज जैन यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत महिलेला पोलीस वाहनातून घाटीत रवाना केले. तसेच घटनास्थळी असलेला ट्रक वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात घेऊन गेले.

बातम्या आणखी आहेत...