आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारी मतमोजणी:अधिसभेसाठी 98% मतदान; 89 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळांच्या निवडणुकीसाठी चार जिल्ह्यातील १७ केंद्रांवर शनिवारी मतदान झाले. चार जिल्ह्यांतील ४,२०५ मतदार होते. पैकी ९८ टक्के म्हणजेच ४०८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ८९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. १३ डिसेंबरला सकाळी ९ वाजता मतमोजणी होईल.

दुसऱ्या टप्प्यातील अधिसभेच्या २५, तर विद्या परिषदेच्या ६ जागा व अभ्यास मंडळांची निवडणूक प्रक्रिया शनिवारी पार पडली. सकाळी ८ ते ५ दरम्यान केंद्रांवर रांगा लावून प्राध्यापकांनी मतदान केले. यंदा पहिल्यांदाच मुख्य इमारतीच्या व्यवस्थापन परिषद कक्षातील ‘वॉर रूम’ मधून मतदान प्रक्रियेवर नियंत्रण ठेवले गेले. संस्थाचालक मतदारसंघातील अविनाश येळीकर आणि रंजना पाटीदार आजारी असतानाही मतदान केंद्रावर आले. डॉ. सुरेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेतील निवडणूक सल्लागार समितीची कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी शनिवारी बैठक घेतली. १३ डिसेंबरला बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणी केली जाणार आहे. त्याचा कुलगुरूंनी आढावा घेतला. या वेळी डॉ. साखळे, डॉ. सतीश पाटील, डॉ. राम चव्हाण, डॉ. मुस्तजीब खान, डॉ. नंदीता पाटील, उपकुलसचिव डॉ. विष्णू कऱ्हाळे, दिलीप भरड यांची उपस्थिती होती.

डॉ. साखळेंनी तातडीने वाढवले मतदान कक्ष
विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागात दोन बूथवर मतदान सुरू होते. दोन्ही बूथवर सकाळपासूनच मतदारांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. सकाळी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भगवान साखळे यांनी या केंद्राला भेट दिली त्या वेळी त्यांना रांगा दिसल्या. त्यांनी तातडीने मतदान कक्षाची संख्या दुपटीने म्हणजेच २ च्या ऐवजी ४ मतदान कक्ष केले. कुलगुरू‌, डॉ. साखळे यांनी दोन्ही केंद्रांना भेट दिली. केंद्राध्यक्ष डॉ. सीमा कवठेकर, डॉ. गणेश पांढरे यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...