आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शेतात काम करत असताना 12 वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना आष्टी तालुक्यातील किन्ही येथे घडली आहे. या बिबट्याच्या हल्ल्यात स्वराज भापकर(10) बालकाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील किन्ही येथे स्वराज आपले काका कृष्णा हिंगे यांच्यासोबत शेतात काम करत होता. यावेळी दुपारी 12.45 च्या सुमारास अचानक बिबट्याने झडप मारून स्वराजला उचलून नेले. याची माहिती वा-यासारखी सोशल मिडियावर पसरताच वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर स्वराजचा शोध घेतला असता तो काही अंतरावर मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी स्वराजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलू असून, पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांनी सावध राहावे- सुरेश धस
'ही घटना अत्यंत दुर्देंवी आहे. त्यामुळे वनविभागाच्या अधिका-यांनी वेळीच बिबट्याचा शोध घेणे गरजेचे असून नागरिकांनीही आता सावधानता बाळगणे गरजेचे आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक तसेच शेतक-यांनी शेतमजुरांना एकटे न राहता समुहाने काम करावे. सायंकाळी लवकर शेतामधून घरी परतावे. लहान मुलांची विषेश काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.