आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:साळवा पाटी येथे भरधाव ट्रकच्या धडकेत बारा वर्षांचा मुलगा ठार, चौघे जण गंभीर जखमी

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी ते आखाडा बाळापुर मार्गावर भरधाव ट्रकने दोन बैलगाडीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात १२ वर्षाचा मुलगा ठार झाला असून चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी (ता. २१) सायंकाळी सहा वाजता हा अपघात घडला. अपघातातील जखमींना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील येथील प्रताप माखणे यांचे कुटुंबीय बैलगाडीतून शेतात पेरणीची कामे आटोपून घराकडे निघाले होते. यावेळी आणखी एक बैलगाडी देखील त्यांच्यासोबत होती. दोन बैलगाडया साळवा पाटी जवळ  आला असताना आखाडा बाळापूर येथून कळमनुरीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दोन्ही बैलगाड्या धडक दिली. त्यानंतर ट्रक उलटला यामध्ये शिवम प्रताप माखणे ( १२ ) हा मुलगा ट्रक खाली दबून ठार झाला. तर अपघातामध्ये इतर चार जण जखमी झाले आहेत. या मध्ये प्रताप विश्वनाथ माखणे ( ३५), निता प्रताप माखणे (३०)  कुंडलिक लक्ष्‍मण आवटे (६०), शिवाणी प्रताप माखणे (१७ ) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने आखाडा बाळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या चौघांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, जमादार संजय मार्के, राजेश जाधव, बाबुराव चव्हाण, मधुकर नागरे, नागोराव बाभळे, पंढरी चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी सुमारे एक ते दीड हजार लोकांचा जमाव जमला होता. संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक करून ट्रक पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी जमावाची समजूत काढली. त्यानंतर या अपघातात ठार झालेल्या शिवम प्रताप माखणे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता. या अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याचे सूत्रांनी सांगितले.

मयत शिवम माखणे  हा इयत्ता सातवी वर्गामध्ये शिकत असल्याचे सांगण्यात आले आहे. शाळेला सुट्टी असल्यामुळे तो आई-वडिलांसोबत शेतात पेरणी च्या कामासाठी गेला होता. अभ्यासामध्ये हुशार असलेला शिवम लवकरच शाळा सुरु होणार असल्याने आनंदी होता.

बातम्या आणखी आहेत...