आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात सर्वात उंच इमारत उभारण्यासाठी बिल्डरांची तयारी सुरू झाली आहे. सातारा परिसरातील गट नंबर ३९ मधील अडीच एकर जागेत एएमटी इन्फ्रास्ट्रक्चरला २२ मजली टॉवर उभारण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे परवानगी मिळावी म्हणून प्रस्ताव दाखल होता. तब्बल नऊ महिन्यांनंतर मनपाने परवानगी दिली आहे.
शहरात १५ मजल्यांची इमारत बांधण्यात आलेली आहे. तसेच दहा ते बारा मजल्यांच्या अनेक इमारती उभारल्या जात आहेत. राज्य शासनाने नगररचनाच्या नियमांमध्ये बदल केल्यामुळे ७० मीटर उंचीच्या इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी ४६ मीटर उंचीच्या इमारती बांधण्यास परवानगी दिली जात होती. नवीन नियमानुसार पहिल्यांदाच २२ मजली इमारत उभी राहील. यासंदर्भात नगररचना उपसंचालक ए. बी. देशमुख म्हणाले, साताऱ्यात अडीच एकरमध्ये सिंगल टॉवर उभारले जाणार आहे. या इमारतीत थ्री बीएचकेचे ८८ फ्लॅट असतील. या इमारतीच्या प्रस्तावांची छाननी मनपाच्या उपअभियंत्यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.