आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:लॉकडाऊनमध्ये फिरण्यासाठी दुचाकी न दिल्याने 22 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

वसमत9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत येथील बँक कॉलनी भागात लॉकडाऊनमध्ये फिरण्यासाठी दुचाकी वाहन का दिले नाही या कारणावरून २२ वर्षीय तरुणाने राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशीरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हिंगोेली जिल्हयात कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी आहे. सायंकाळी पाच वाजल्यानंतर सर्व दुकाने बंद केली जात आहेत. त्यानंतर रात्री घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र वसमत येथील बँक कॉलनी भागातील प्रमोद शिवहार डांगे (२२) याने गावात फिरण्यासाठी त्याची वडिल शिवहार डांगे यांच्याकडे दुचाकी वाहन देण्याची मागणी केली. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे दुचाकी वाहनाची चाबी मिळणार नाही असे शिवहार डांगे यांनी सांगितले. याचा राग आल्याने प्रमोद डांगे याने घराच्या वरच्या खोलीमध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. घराच्या वरच्या खोलीतून आवाज येत नसल्याने रात्री त्याच्या कुटुंबियांनी खोलीचा दरवाजा वाजविला तसेच प्रमोद याला आवाज पण दिले. मात्र आतून प्रतिसाद मिळाला नसल्याने खिडकीतून पाहणी केली असता मुलगा प्रमोद डांगे याने गळफास घेल्याचे दिसून आले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर वसमत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक उदय खंडेराय, जमादार प्रेमदास चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी शिवहार डांगे यांच्या माहितीवरून वसमत शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जमादार प्रेमदास चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...