आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य शासनास अहवाल:विद्यापीठाच्या 3 सदस्यीय समितीने नोंदवून घेतले 16 जणांचे जबाब

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गजानन मुंडेची आत्महत्या आणि पूजा साळवेला जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात विद्यापीठ प्रशासन नियुक्त तीन सदस्यांच्या समितीने केलेल्या तथ्यसंकलनाचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी बुधवारी दिली. अहवालात १६ जणांच्या जबाबाची नोंद आहे, असेही त्यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागातील संशोधक गजानन मुंडेने शासकीय विज्ञान संस्थेच्या आवारातील जैवभौतिकशास्त्र विभागात जाळून घेतल्याची घटना घडली होती. त्यानंतर कुलगुरू डॉ. येवले यांनी कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. विभागप्रमुख डॉ. ई. आर. मार्टिन व डॉ. अंजली राजभोज हे समितीतील इतर दोन सदस्य आहेत. या समितीला दोन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलेहोते. याबाबत कुलगुरू म्हणाले की, समितीने शासकीय विज्ञान संस्था, प्राणिशास्त्र विभाग, घाटी रुग्णालय तसेच विद्यार्थी राहत असलेल्या वसतिगृहाला भेट देऊन १६ जणांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.

या प्रकरणात नेमके काय घडले याबाबतच्या अहवालाची प्रत पोलिस प्रशासन, उच्च शिक्षण संचालक तसेच राज्य शासनाकडेही पाठवण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या विभागांमध्ये विशाखा समिती असून अशी प्रकरणे या समितीकडे येतात. मात्र, हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत गेले. विद्यार्थिनीने त्या विद्यार्थ्यासंबंधीची तक्रार पोलिसांत देऊन त्याची एक प्रत पोस्टाने विभागालाही पाठवली होती, असेही डॉ. येवले यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...