आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्‍महत्‍येेचा प्रयत्‍न:शेतातून नियमबाह्य रस्ता दिल्याचा निकाल ऐकून 45 वर्षीय महिलेने तहसीलमध्ये विष घेण्याचा प्रयत्न

सोयगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महसूल विभागाने कोणतीही पूर्वकल्पना तसेच सुनावणीची नोटीस न देताच शेतातून नियमबाह्य रस्ता दिल्याचा निकाल ऐकून ४५ वर्षीय महिलेने नायब तहसीलदारांच्या दालनातच कीटकनाशक प्राशन करण्याचा प्रयत्न केला. यात महिला अत्यवस्थ झाल्याची घटना सोमवारी (५ सप्टेंबर) सोयगाव तहसील कार्यालयात तीन वाजेच्या सुमारास घडली.

या प्रकारामुळे सोयगाव तहसील कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता. तातडीने घटनास्थळी सोयगाव पोलिसांनी पाचारण करण्यात येऊन गंभीर महिलेला तातडीने उपचारासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चंद्रकालाबाई पांडुरंग शिंदे (४५, रा. पळाशी, ता. सोयगाव) असे हृदयविकाराच्या झटका येऊन बेशुद्ध झालेल्या महिलेचे नाव आहे. पळाशी शिवारात या महिलेचे गट क्र-२९७ एक हेक्टर शेती आहे, याच शिवारातून गट क्र-२९५ आणि २९६ कडे जाण्यासाठी व येण्यासाठी गैरअर्जदार आणि प्रतिवादी इतर दोन विरुद्ध चार अशा सहा शेतकऱ्यांना याप्रकरणी नोटिसा देण्यात आल्या होत्या.

मात्र, याप्रकरणी चंद्रकलाबाई शिंदे या महिलेला रस्त्याच्या सुनावणीसाठी कोणतीही नोटीस अथवा पूर्वकल्पना प्राप्त नव्हती. दरम्यान, आपल्याच शेतातून गट क्र-२९७ मधून रस्ता दिल्याची कुणकुण या महिलेला लागली होती. त्यामुळे या महिलेने पळाशीवरून थेट सोयगाव तहसील गाठून हातात चक्क विषारी कीटकनाशकाची बाटली घेऊन नायब तहसीलदार महसूल-१ गोरखनाथ सुरे यांचे दालन गाठले व माझ्या शेतातून नियमबाह्य रस्ता कोणत्या आधारावर दिला याचा जाब विचारला. यावेळी नायब तहसीलदार सुरे यांनी शेतातून जुना वापरता व बंद केलेला रस्ता दिल्याचे सांगितल्याने या महिलेने हातातील कीटकनाशकाचे प्राशन करण्याचा प्रयत्न केला.

बातम्या आणखी आहेत...