आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह:52 वर्षीय शिक्षकाची रेल्वेसमोर आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेहमीप्रमाणे पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले रामानंद अनंत दरबेस्वार रविवारी यांनी शिवाजीनगर रेल्वेरुळावर उडी घेत आत्महत्या केली. ५२ वर्षीय रामानंद हे दौलताबाद केंद्राअंतर्गत येणाऱ्या रामपुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबासह ते शहानूरवाडी परिसरातील ज्ञानेश्वरनगरमध्ये राहत होते. ते रोज सकाळी फिरण्यासाठी जात होते. रविवारी देखील सकाळी ते घराबाहेर पडले.

मात्र, परतलेच नाही. दरम्यान, जवाहरनगर पोलिसांना शिवाजीनगर भागातील रेल्वेरुळावर मृतदेह आढळल्याची माहिती प्राप्त झाली. उपनिरीक्षक संतोष राऊत सहकाऱ्यांसह तत्काळ रवाना झाले. तपासामध्ये रामानंद यांनीच रेल्वेसमोर आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी आत्महत्या का केली, याचा पोलिस तपास करत आहेत.

उच्चशिक्षित कुटुंब : रामानंद यांचे कुटुंब उच्चशिक्षित आहे. त्यांची पत्नी महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका आहेत. त्यांची मुलगी मुंबईच्या एका बड्या रुग्णालयात डॉक्टर असून मुलगा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत आहे. कुटुंबाच्या जबाबानंतर नेमके कारण समोर येईल, असे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी सांगितले.