आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहोर्डिंग लावून देण्यात आलेले वाढदिवसाचे निमंत्रण, गावोगावहून आलेले तब्बल ७०० पाहुणे, त्यांची जेवणावळ, पुण्याहून आणलेला बँड, ड्राय फ्रूटचा आणि चेलीपुरा ते संस्थान गणपतीपर्यंत भव्य मिरवणूक ... हा थाट होता कुणा नेत्याच्या किंवा सेलिब्रिटीच्या नव्हे तर सूरज रेड्याच्या वाढदिवसाचा. शंकरलाल पहाडिया यांचा रेडा काल दोन वर्षांचा झाला. नागपूर हेटी प्रजातीच्या या रेड्याचा त्यांनी जिवापाड सांभाळ केला आहे. त्यामुळे त्याचा वाढदिवसही असा अविस्मरणीय पद्धतीने साजरा केला.
पशुपालक अहिर गवळी समाजाचे असलेले करलाल पहाडिया आपल्या मुलाप्रमाणेच सूरजचा सांभाळ करीत आहेत. त्याच्यावर ते दर महिन्याला १२ हजार रुपये खर्च करतात. या प्रेमापोटीच त्यांनी याचा दुसरा वाढदिवस अशा प्रकारे जंगी स्वरूपात साजरा करण्याचा ठरवलं. त्यासाठी त्यांनी आठ ते दहा दिवसांपूर्वी शहरात होल्डिंग लावले. तेव्हापासूनच या वाढदिवसाबद्दल चर्चा सुरू झाली होती. विशेष म्हणजे या अनोख्या वाढदिवसासाठी चक्क नांदेड व जालन्यातून ५० पाहुणे आले होते. पाहुण्यांसाठी व्हेज पुलाव, बिर्याणी कचुंबर तयार करून ७०० च्या जवळपास पाहुण्यांना जेवणावेळसुद्धा देण्यात आली.
असा आहे सूरज रेड्याचा आहार सकाळी दोन लिटर दूध व संध्याकाळी दोन लिटर दूध. दररोज चार किलो सरकी पेंड, दोन किलो गहू भरडा, महिन्याला पाच हजारांचा कडबा.
मुलापेक्षा कमी नाही म्हणून केला वाढदिवस साजरा मुलाप्रमाणेच आमचा पशूंमध्येसुद्धा जीव असतो. सूरज रेड्याला मागील दोन वर्षांपासून मुलाप्रमाणे काय मुलापेक्षाही जास्त जीव लावला. मग त्याचा वाढदिवस पण जंगीच साजरा करण्याची इच्छा होती म्हणून केला. - शंकरलाल पहाडिया, सूरजचे मालक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.