आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:अल्पसंख्याकांच्या योजनांची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित करावी

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य अल्पसंख्यांक आयोगामार्फत १८ डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. अल्पसंख्याक विभागातर्फे जनहिताच्या विविध योजनांबाबतची माहिती देणारी पुस्तिका १८ डिसेंबरला प्रकाशित करण्यात यावी, या मागणीचे निवेदन मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कृती समितीचे अध्यक्ष तथा वेलकम शैक्षणिक सामाजिक संस्थेचे सचिव अझर पठाण यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

अल्पसंख्याक समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवत आहे. त्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची माहिती करून देण्यासाठी व्याख्यानमाला, परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यक्रम आयोजित केले जातात. त्या दिवशी ही पुस्तिका प्रकाशित करण्यात यावी. योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहचण्यासाठी या पुस्तिकेची मदत होईल, असे या निवेदनात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...