आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल:जळत्या कचऱ्यातील बाटली पेटून स्फोट; खेळणारा मुलगा भाजला

छत्रपती संभाजीनगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळल्यानंतर त्यातील बाटलीचा स्फोट झाला. ती हवेत उडून तिचे तुकडे ११ वर्षांच्या मुलाला लागल्याने तो जखमी झाला. कुटुंबाने मुलाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून कचरा जाळणाऱ्या वंदना गणेश मुळेंवर पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ६ मार्च रोजी दुपारी एक वाजता गारखेड्यातील मयूर टेरेस परिसरात अर्णव अभय देशमुख (११) उद्यानात खेळत होता. तेव्हा मुळे यांनी तेथील कचऱ्याला आग लावली. कचऱ्याने पेट घेताच एका बाटलीचा भडका उडाला.बाटलीचे तुकडे लागून अर्णवच्या मान, चेहरा, कानाजवळ खोलवर जखमा होऊन ताे भाजला गेला. त्याचे काही केसदेखील जळाले. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...