आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल:सराफा व्यावसायिकाला बाहेर बोलावून मारहाण

छत्रपती संभाजीनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोन्याची किंमत विचारायला येऊन एका अनोळखी तरुणाने सराफा व्यावसायिकाला नाहक मारहाण करत जखमी केले. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३० वाजता बायजीपुऱ्यात घडली. लक्ष्मण छोगालालजी टेलर यांचे विजय लक्ष्मी ज्वेलर्स नावाने बायजीपुऱ्यात दालन आहे. रात्री एका इसमाने दुकानाबाहेर जाऊन, मी दोन वर्षांपुर्वी सोने घेतले होते. त्याची किंमत किती येईल, असे विचारले. लक्ष्मण यांनी त्याला काय वस्तु आहे, पावती आहे का, असे विचारताच त्याने हातातील टोकदार वस्तुने त्यांच्यावर वार केले. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...