आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीटरमध्ये फेरफार:वीजचाेरी करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल ; आकडा टाकून घेतली वीज

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीटरमध्ये फेरफार तसेच आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्या पाच जणांवर महावितरणने सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. महावितरणच्या चिकलठाणा एमआयडीसी शाखेचे सहायक अभियंता श्याम मोरे, त्यांचे सहकारी सुधीर गाढे, संजय साबळे, नागराज खिल्लारे, आकाश दणके, गोरठे व इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पथकाने ऑगस्टमध्ये विविध वीज जोडण्यांची तपासणी केली. त्यात मिसारवाडीतील विलास बोर्डे याने मीटरला येणाऱ्या सर्व्हिस वायरला टॅपिंग केल्याचे आढळले. त्याने ७९० युनिट्सची १५ हजार ३१९ रुपयांची वीजचोरी केली. शेख जुलेखाबी सादेक शेख या ग्राहकाने १०९२ युनिट्सची ११ हजार ७७२ रुपयांची वीजचोरी, संदीप मोटे याने २००२ युनिट्सची ३० हजार २०१ रुपयांची वीजचोरी केली. भाड्याच्या घरात राहणाऱ्या सुभाष खरसान याने आकडा टाकून १२९६ युनिट्सची २२ हजार ३८६ रुपयांची वीजचोरी केली. चिकलठाणा एमआयडीसीत पावरलूम रोडवर शिवाजी शिंदे यानेही सर्व्हिस वायरला टॅपिंग करून ३५५१ युनिट्सची ५७ हजार ९८९ रुपयांची वीजचोरी केली.

बातम्या आणखी आहेत...