आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:वारंगा फाटा शिवरात चारचाकी वाहनासह विदेशी दारू जप्त चौघांवर गुन्हा दाखल

हिंगोली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा शिवारामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणारे वाहन पकडले आहे. याप्रकरणी चौघांवर सोमवारी ( ता. ६)  रात्री उशिरा आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा शिवारामध्ये बेकायदेशीररित्या विदेशी दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडारवार, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, माकणे, सुवर्ण वाळके, जमादार विलास सोनवणे, शंकर जाधव, संभाजी लकुळे, विशाल घोळवे, किशोर कातकडे, ज्ञानेश्वर सावळे, दीपक पाटील, आकाश टापरे, विठ्ठल काळे यांच्या पथकाने सोमवारी रात्री वारंगा फाटा शिवारात सापळा रचला होता.

 त्यानंतर पोलिसांनी एका बोलेरो वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी ९ लाख १८हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.  यामध्ये बोलेरो वाहनासह विदेशी दारूचा समावेश आहे. 

याप्रकरणी आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात अमोल गणपतराव वाकोडे (रा. पिंपरखेड ता. हदगाव), संतोष गणेशआप्पा पत्रे (रा. तोंडापूर ता. कळमनुरी),  अनिकेत अशोकराव पावडे (रा. नांदेड ) वैभव देशमुख यांच्याविरुद्ध दारूबंदी अधिनियम तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि हुंडेकर पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...