आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:पत्नी व मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या चालक पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे पुढील तपास करीत आहेत.

औंढा तालुक्यातील आसोला येथे पुराच्या पाण्यामध्ये कार वाहून गेल्याने पत्नी व मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या प्रकरणी पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात बुधवारी ता. 14 रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील योगेश पडोळ त्यांची पत्नी वर्षा पडोळ मुलगा श्रेयन पडोळ व मावस मेव्हणा रामदास शेळके हे रविवारी ता. 11 रात्री साडे नऊ वाजता जवळा बाजार येथून आसोला मार्गे गोळेगाव येथे येत होते. त्यानंतर त्यांना औरंगाबाद येथे जायचे होते.

मात्र असोला येथील ओढ्याला पूर आल्यानंतरही पुराच्या पाण्यातून कार बाहेर काढण्याचा प्रयत्न चालक योगेश पडोळ यांनी केला. मात्र या प्रयत्नात कार ओढ्याच्या पुरात मधोमध अडकून पडली. यामध्ये कारमधून कसेबसे बाहेर पडलेले चौघेही जण वाहून गेले. मात्र योगेश व रामदास दोघांनी झाडाचा आसरा घेतला. तर वर्षा व श्रेयन दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यानंतर सोमवारी ता. 12 त्यांचा मृतदेह सापडला. या प्रकरणात रामदास शेळके यांनी बुधवारी ता. 14 हट्टा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

यामध्ये त्यांची मावस मेव्हूणे व कार चालक योगेश पडोळ यांनी निष्काळजीपणाने कार चालवून पुराच्या पाण्यातून कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच दोघांचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद केले. यावरून पोलिसांनी वर्षा व श्रेयन यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी योगेश वर गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...