आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराचे नामांतर केल्याच्या विरोधात ४ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर साखळी उपाेषण सुरू झाले आहे. यात एका तरुणाने औरंगजेबाचे फोटो असलेले पोस्टर हाती घेऊन दोन गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी रविवारी दुपारी चौघांवर कलम-१५३ (अ), ३४ नुसार सिटी चौक पोलिस ठाण्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक मीर आरेफ अली यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या एका प्रकरणात शनिवारी रात्री ८.३० वाजता घाटी परिसरातील एका चौकाला वादग्रस्त नाव दिल्याने साजिद सईद शेख (२३, रा. चिकलठाणा) याच्यावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे कलम १५३ (अ) आणि ३४ : धर्म, भाषा, वंश इत्यादींच्या आधारे लोकांमध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कलम १५३(अ) अंतर्गत गुन्हा दाखल होतो. यात ३ वर्षांपर्यंतचा कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. तर, कलम ३४ नुसार, जेव्हा एखादे गुन्हेगारी कृत्य सर्व व्यक्तींद्वारे समान हेतूने केले जाते, तेव्हा प्रत्येक व्यक्ती अशा कृत्यासाठी जबाबदार असतो. (प्रत्यक्षात फोटो, होर्डिंग जरी एका तरुणाच्या हाती असले तरी सोबतच्या तिघांचाही तोच हेतू असल्याने त्यांच्यावरही कलम ३४ नुसार गुन्हा दाखल झाला.)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.