आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील ९५ शेतकऱ्यांकडून कर्जाची परतफेड म्हणून वसूल केलेले पैसे स्वत: वापरून नेटाफिम अॅग्रिकल्चर फायनान्सिंग एजन्सी प्रा. लि. (नाफा) कंपनीची ३७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अॅग्रो प्रोसेसर आणि पब्लिशर्स प्रा. लि. चा व्यवस्थापकीय संचालक संजीव पंढरीनाथ उन्हाळे (६५, रा. प्राइड पार्क, वेदांतनगर) याच्यावर न्यायालयाच्या आदेशाने वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नेटाफिम अॅग्रिकल्चरलचे सहायक विधी व्यवस्थापक सोमनाथ बाबासाहेब ढोले (४१, रा. एन-४, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, ही नॉन बँकिंग कंपनी असून ती शेतकऱ्यांना शेतीविषयक कामांसाठी कर्जपुरवठा करते. सन २०१३ साली उन्हाळेच्या दिलासा एनजीओने केलेल्या शिफारस व कर्जवसुलीची हमी घेतल्याने १२७ शेतकऱ्यांना ठिबक सिंचन व अन्य शेतीकामासाठी कर्जपुरवठा केला होता. या शेतकऱ्यांकडून कर्ज वसूल करून ते नाफाकडे जमा करण्याचे काम उन्हाळेच्या संस्थेचे होते. मात्र, ९५ शेतकऱ्यांची ३७ लाख ६ हजार ५५५ रुपयांची रक्कम उन्हाळेकडे जमा करूनही ती रक्कम नाफाकडे भरली नाही. त्यावर नाफाने वेदांतनगर ठाण्यात तक्रार दिली. मात्र, तत्कालीन पोलिस निरीक्षकांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने नाफाने हे प्रकरण न्यायालयात नेले. अखेर न्यायालयाच्या आदेशाने ४ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.