आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:अवैध मुरुमाने भरलेल्या ट्रॅक्टरचालकाने ठोकली धूम, पाचोडमध्ये गुन्हा दाखल

पाचोड4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागात दिवसाढवळ्या मुरूम तस्करांनी उच्छाद मांडल्याने महसूल विभागाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. दरम्यान, पैठण उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार शंकर लाड यांच्या पथकाने गुरुवार रोजी विहामांडवा परिसरात अवैध मुरुमाने भरलेला ट्रॅक्टर पकडला होता. मात्र, ट्रॅक्टर चालकाने चक्क उपविभागीय अधिकाऱ्यासमोरच मुरुमाने भरलेल्या ट्रॅक्टर घेऊन धूम ठोकल्याची धक्कादायक घटना घडल्याने चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...