आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:सोशल मीडियावर तरुणीची बदनामी करणारा अटकेत, सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बलात्काराच्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामबापूच्या शिष्याने ओळखीच्या तरुणीची सोशल मीडियावर बनावट प्रोफाइल बनवून तिची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सोमवारी पोलिसांनी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून आसारामबापूच्या गुरुकुलमधून आरोपीला अटक केली. गोविंद राजेंद्र नाईक (३६, मूळ रा. ओडिशा) असे त्याचे नाव आहे. गोविंद हा छिंदवाडा येथे जाण्याआधी शहरातील आसारामबापूच्या एका स्टॉलवर काम करत होता. या वेळी त्याची ओळख २६ वर्षीय राधा (नाव बदलले आहे) सोबत झाली. गोविंदला राधा आवडत असल्याने त्याने लग्नासाठी तगादा लावला. मात्र, तिने नकार दिला. त्यानंतर तो आसारामबापूच्या छिंदवाडा गुरुकुलमध्ये आचारी म्हणून काम करू लागला. २० ऑगस्ट २०२१ रोजी सोशल मीडियावर राधाच्या नावाची बनावट प्रोफाइल बनवून कॉलगर्ल म्हणून तिचा मोबाइल नंबर त्या प्रोफाइलवर टाकला. त्यावरून अनेकांनी राधासोबत अश्लील चॅटिंग सुरू केली. शेवटी तिने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे आणि त्यांच्या पथकाने तपास करून छिंदवाडा येथील गुरुकुलमध्ये आचाऱ्याचे काम करत असलेल्या गोविंदला सोमवारी अटक केली.

बातम्या आणखी आहेत...