आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली शहरातील आदर्शनगर भागातील अन्नपूर्णा फायनान्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्या विरुध्द १५ लाख रुपायांच्या अपहार प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. १९ सायंकाळी उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी २.५० लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील आदर्शनगर येथे ओडीसा राज्यातील अन्नपूर्णा फायनांन्स या कंपनीची शाखा आहे. या कंपनीकडून बचत गटांना कर्ज दिल्या जाते. त्यानंतर या कर्जाची हप्तेवारी नुसार परतफेड घेतली जाते. गटांनी दिलेल्या कर्जाच्या परतफेडीची रक्कम दररोज जमा झाल्यानंतर सदर रक्कम बँकेत जमा केली जाते.
दरम्यान, शनिवारी ता. ९ व रविवारी ता. १० जानेवारी रोजी या कंपनीकडे १८.५० लाख रुपयांची रक्कम जमा झाली होती. सदर रक्कम रविवारी ता. १० रात्रीच्या वेळी बँकेतील चौघांच्या समक्ष तिजोरीत ठेवण्यात आली होती. मात्र सोमवारी ता. ११ सकाळी सदरील रक्कम तिजोरीत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक यतीष देशमुख, पोलिस उपनिरीक्षक मनोज पांडे, नितीन केनेकर, जमादार सुधीर ठेंबरे, गजानन होळकर, शेख मुजीब, दिलीप बांगर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी या प्रकरणात बँकेच्या कर्मचाऱ्यांचीच चौकशी सुरु केली. बँकेतील तिजोरीच्या दोन्ही चाव्या कर्मचारी शंकर वानखेडे (रा. गिराड जि. वाशीम) याच्याकडे होत्या. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यात त्याने २.५० लाख रुपयांची रक्कम पोलिसांकडे दिली. पोलिसांनी सदर रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणी कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक हर्षद हिवसे यांच्या तक्रारीवरून शंकर वानखेडे याच्या विरुध्द १५ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक बनसोडे पुढील तपास करीत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.