आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​कराओकेवर रंगला कार्यक्रम:साठी ओलांडलेल्या ज्येेष्ठांनी हिंदी गाण्यांची मैफल गाजवली

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेडी म्युझिकच्या वतीने ‘तुम हसी मैं जवान या सदाबहार हिंदी गाण्यांची मैफल शनिवारी कै. भानुदास चव्हाण सभागृहात रंगली. वुई बी इिटायर बट नॉट टायर्ड या घोषणेला अनुसरून कराओेके ट्रकवर ज्येेष्ठांनी गाण्यांची मैफल रंगतादार केली. एकाहून एक सुरेल गाणी रसिकांचा प्रतिसाद मिळवत होती. वयाची साठी ओलांडलेल्या ज्येष्ठांचा हा सोहळा विलक्षण ठरला. यामध्ये रतन नगरकर, मीना अग्रवाल, महर्षी पिंपळकर, अनिल जोशी आणि शुभांगी जोशी यांनी सहभाग नोंदवला. पूजा नगरकर यांनी सूत्रसंचालन केले. गाण्यांची ही मैफल ज्येष्ठांच्या चिरतरुण असण्याची पावती देणारी होती.

बातम्या आणखी आहेत...