आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:कंत्राटी कामगारास लुटले; आरोपीस पोलिस कोठडी

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चाकूचा धाक दाखवत रोख १० हजार ५०० रुपये हिसकावून पळ काढल्याची घटना १ मार्च रोजी मध्यरात्रीनंतर बाबा पेट्रोल पंप परिसरात घडली. या प्रकरणी अनिकेत बाळू ढावरे (२४, रा. आंबेडकरनगर, पुणे, ह. मु. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील लॉज) याच्या फिर्यादीवरून क्रांती चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी आरोपींपैकी मोहम्मद आमेर खान मोहम्मद सलीम खान (३२, रा. कासंबरी दर्गा, पडेगाव) याला अटक केली. त्याला ५ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. आर. देशपांडे यांनी दिले. जी-२० परिषदेनिमित्त लाइटिंगचे काम पुण्यातील युवराज शिंदे यांनी घेतलेले आहे. शिंदे यांच्याकडे अनिकेत हे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होते. ते सहकाऱ्यांसह कामाची पाहणी करत असताना ही घटना घडली होती.

बातम्या आणखी आहेत...