आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीबी का मकबराच्या एका मिनाराचा कोपरा ढासळला:सततच्या पावसामुळे भाग क्षतिग्रस्त, दीड वर्षापूर्वीच डागडुजी केली होती

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक वारसा सप्ताह सुरू असतानाच शहरातील दख्खनचा ताज म्हणून ओळख असलेल्या बीबी का मकबऱ्याच्या एका मिनाराचा भाग कोसळल्याने ऐतिहासिक स्थळाच्या दुरुस्ती, देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मकबऱ्याच्या आग्नेय दिशेला असलेल्या मिनाराच्या बाल्कनीचा भाग शनिवारी सायंकाळी कोसळला. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही. या घटनेनंतर पुरातत्त्व विभागाने हा परिसर पर्यटकांसाठी बंद केला.सततच्या पावसामुळे पडझड झाली, नुकसानग्रस्त मिनारची लवकरच दुरुस्ती केली जाईल, असे पुरातत्त्व विभागाने सांगितले आहे.

दीड वर्षापूर्वीच केली होती मकबऱ्यात डागडुजी

मकबऱ्याच्या डागडुजीचे काम दीड वर्षापूर्वीच करण्यात आले होते तरीही हा भाग कोसळला आहे. मकबऱ्याच्या आतील भागाचे काम करण्यात येणार होते, मात्र पावसाळ्यात ते थांबल्याचे सांगण्यात येते. मकबऱ्याला किती तडे गेले आहेत हे समजण्यासाठी या वास्तूची पाहणी केली जावी,अशी मागणी करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...