आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात मजूर जखमी:देवळाई चौकात उड्डाणपुलाचा स्लॅब भरताना क्रेन कोसळली

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उड्डाणपुलाचा स्लॅब भरत असताना कोसळल्याची गंभीर घटना देवळाई चौकात बुधवारी सायंकाळी घडली. यात एक मजूर जखमी झाला. मात्र, जवळपास कोणी उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून बीड बायपास रस्त्याच्या रुंदीकरणाचे आणि उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. एमआयटी चौकासह संग्रामनगर उड्डाणपूल व देवळाई चौकात या पुलांचे काम सुरू आहे. बुधवारी देवळाई चौकातील उड्डाणपुलावर गर्डर चढविण्यात आले. त्यानंतर उड्डाणपुलाचा स्लॅब भरण्याचे काम सुरू असतांना सायंकाळी सहा वाजता अचानक क्रेन सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीनवर कोसळली. त्यात एक मजूर जखमी झाला. अपघातामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...