आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाथषष्ठीनिमित्त पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या मंदिरात दहीहंडी महोत्सव साजरा करण्यात यावा, मंदिर परिसरातील दहीहंडीस परवानगी देऊ नये, अशी मागणी करत नाथवंशजांकडून खंडपीठात दाखल याचिकेत दिवाणी अर्ज दाखल झाला होता. खंडपीठाचे न्या. संदीपकुमार मोरे यांनी नाथवंशजांची मागणी फेटाळल्याने संस्थानच्या मंदिर परिसरातील दहीहंडी महोत्सव साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यभरातून पैठण येथे सहा ते सात लाख भाविक नाथषष्ठी सोहळ्यासाठी जमा होतात. मंदिरात दहीहंडी नाथ वंशज साजरी करू शकतात. मंदिराबाहेर संस्थानच्या विश्वस्त मंडळातर्फे मागील चार वर्षांपासून सुरू असलेला महोत्सवाला बाधा येणार नाही. महोत्सवाचा समारोप १५ मार्च रोजी काल्याच्या दहीहंडीने सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
मंदिरात आता दहीहंडी महोत्सव साजरा होत असल्याने लाखो भाविक त्यापासून वंचित राहतात. त्यामुळे संस्थान विश्वस्त मंडळाने मंदिराबाहेर महोत्सव घेण्याचे निश्चित केले. दिंडीतील वारकऱ्यांकडून दहीहंडी फोडली जाते. दहीहंडी आमचा अधिकार असून ती मंदिरात व्हावी, अशी नाथवंशजांची मागणी होती. त्यासाठी नाथवंशज मधुसूदन रंगनाथबुवा गोसावी यांनी दिवाणी अर्ज दाखल केला होता. संस्थान विश्वस्तांच्या माध्यमातून अॅड. व्ही. डी. साळुंके यांनी युक्तिवाद करताना दिवाणी अर्ज लागू होत नसल्याचे स्पष्ट केले. नाथवंशजांना दाखल करण्याचा अधिकार नाही. नाथवंशजांच्या अधिकारावर संस्थानच्या विश्वस्तांकडून अतिक्रमण केले जात नाही. मंदिरात नाथवंशजांनी दहीहंडी फोडावी, चार वर्षांपासून बाहेर सार्वजनिक उत्सव साजरा केला जाताेय. त्याला आक्षेप घेण्याचे कारण नाही, असे त्यांनी नमूद केले.
आज दहीहंडी काल्याचे आयोजन १३ मार्चला पहिली दिंडी नाथवंशजांची होती. १४ मार्चला विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते दिंडीप्रमुखांचे स्वागत, रात्री छबिना नाथपंथीयांचा राहील. १५ मार्चला संस्थानच्या वतीने दहीहंडी काला सायंकाळी ५ वाजता हाेणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.