आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:जुन्या भांडणाची कुरापत काढून कोयता आणि कुऱ्हाडी जीवघेणा हल्ला, पाच जण गंभीर जखमी

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जुन्या भावकीच्या वादातून हा प्रकार घडल्याची पोलिसांची माहिती

जुन्या भांडणाची कुरापत काडून कोयता आणि कुऱ्हाडी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील कामखेडा गावाजवळील पवार तांड्यावर घडली आहे. या हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी झाले असून, या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रात्री आठच्या सुमारास घडलेल्या या घटनेने पवार तांड्यावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील कामखेडा गावातील पवार तांड्यावर रात्री 8 वाजता ट्रॅक्टर घेऊन घराकडे चाललेल्या सुरेश पवार यांच्यावर जुन्या भांडणाची कुरापत काढून भावकीतील काही लोकांनी कुर्‍हाडीने कोयत्याने हल्ला केला. त्यांना सोडवण्यासाठी आलेल्या पाच ते सहा जणांना देखील या वेळी जबर मारहाण झाली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पवार तांड्यावर भीतीचे वातावरण आहे. दरम्यान या जीवघेण्या हल्ल्यात सुरेश पांडुरंग पवार(32),संतोष विठ्ठल पवार(36) सुनील बंडू पवार(22),निलाबाई अंकुश आढे (45) आणि रमेश पवार (25) जखमी झाले आहेत.जुन्या भावकीच्या वादातून हा प्रकार झाल्याचा प्रथमदर्शी पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...