आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअपंग उमेदवार असल्याने मदतनीस म्हणून घेतलेला उमेदवार नियमबाह्य असल्याचे सिद्ध झाल्याने राहुल बन्सी राठोड (रा. गव्हाळी, कन्नड) व वाल्मीक एकनाथ काकड (रा. सिनगाव, ता. देऊळगाव) या दोघांवर गुन्हा दाखल झाला. छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार दिली.
विभागाचे प्रशासकीय अधिकारी सूरज वैष्णव यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, त्यांच्या विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदाकरिता २ फेब्रुवारी २०२२ रोजी परीक्षा झाली. चिकलठाण्यातील केंद्रावर झालेल्या परीक्षेत आरोपी राहुल राठोडने दिव्यांग प्रवर्गातून अर्ज भरला होता. त्यास मदतनीस म्हणून वाल्मीक काकडला घेतले होते. दिव्यांग प्रवर्गातून कागदपत्र सादर करण्यास राठोड पात्र ठरला. मात्र, सचिन शिंगणे या उमेदवाराने तक्रार अर्ज सादर केला. त्यानुसार राहुलने मदतनीस म्हणून घेतलेला उमेदवार काकड याची अर्जात नमूद केलेल्यापेक्षा शैक्षणिक पात्रता जास्त असून २०२१ मध्ये घेतलेल्या याच विभागाच्या कनिष्ठ टंकलेखक संवर्गातून त्याची निवड झाली आहे. परंतु, राठोडने स्वत: बीए व त्याची शैक्षणिक अर्हता बारावी लिहिली होती.
विभागाच्या चौकशीत काकड निघाला पदवीधर याप्रकरणी विभागाने चौकशी केली असता काकड पदवीधर निघाला. परीक्षा घेतलेल्या टीसीएसनेदेखील राठोडला मदतनीस म्हणून काकडच बसल्याचे सांगितले. ही फसवणूक समोर येताच विभागाने त्यांच्याविरोधात कारवाईसाठी पावले उचलली आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.