आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग रचना:चार वॉर्डांचा एक प्रभाग; सर्वच इच्छुक धास्तावले

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तीन वॉर्डांचा एक प्रभाग करून त्याचा आराखडा नुकताच मंजूर झाला. आता राज्यात सरकार बदलल्यामुळे चार वॉर्डांचा एक प्रभाग होणार असल्याची चर्चा मनपा वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये घालमेल सुरू झाली आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक येथे चार वॉर्डांचा प्रभाग करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे करणार असल्याचे जाहीर केले होते. महाविकास आघाडी सरकारने पालिकांमधील वाढवलेली सदस्य संख्याही चुकीची असल्याचे म्हटले होते. यानंतर सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांत खळबळ उडाली. औरंगाबाद मनपाच्या प्रभाग रचनेचा आराखडा नुकताच मंजूर झाला. त्यानुसार १२६ वॉर्डांचे प्रत्येक प्रभागात तीन वॉर्ड याप्रमाणे ४२ प्रभाग तयार करण्यात आले आहेत.

५ ऑगस्टला वॉर्डांचे आरक्षण होणार जाहीर
निवडणूक आयोगाने अलीकडेच औरंगाबाद मनपा निवडणुकीसाठी तीन वॉर्डांची प्रभाग रचना अंतिम केली. त्यानुसार ५ ऑगस्ट रोजी आरक्षणाची सोडत निघेल. त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील असा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...