आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ 'दृश्‍यम':औरंगाबादचा पारा 8.9 अंशावर; तीन किमीवरच दृश्‍यमानता, यंदा नोव्हेंबरमध्येच कडाक्याची थंडी

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गतवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच म्हणजे नोव्हेंबरमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. गेल्या वर्षी या काळात पारा १२ खाली आलाच नाही. २१ डिसेंबरला सर्वात कमी १०.४ अंश तापमान नोंदवले गेले, तर २९ जानेवारीला हंगामात प्रथमच तापमान ८ अंशांवर आले. यंदा नोव्हेंबरमध्येच तापमान सरासरीच्या ५ अंशांनी कमी नोंदले गेले आहे.

ओझरला सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील नीचांकी ५.६ अंश तापमानाची नोंद

उत्तरेकडून प्रभाव

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात सर्वच भागांत थंडी वाढली असून सलग दुसऱ्या दिवशी कडाका कायम होता.

दोन दिवस कडाका

आगामी दोन दिवस थंडीचा हा कडाका राहणार असून त्यानंतर दहा दिवस राज्यात गुलाबी थंडीमुळे हुडहुडी कायम राहील.

रब्बीला फायदा

राज्यात सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि कांदा पिकांची लागवड सुरू असून त्यासाठी थंडीचा कालावधी उपयुक्त ठरत आहे.

नोव्हेंबरमध्येच वाढली थंडी

थंडीचा हा कडाका दरवर्षी डिसेंबरमध्ये जाणवतो. मात्र, यंदा नोव्हेंबरमध्येच थंडी वाढली आहे. ओझरचा विचार करता १५ नोव्हेंबर २०२० रोजी तापमान १५ अंश, २०२१ मध्ये १३, तर २०२२ मध्ये ते थेट ५.७ अंशांवर आले आहे.

प्रमुख शहरांतील तापमान

निफाड -७.०, जळगाव -८.२, पुणे -८.८, औरंगाबाद -८.९, नाशिक -९.२, यवतमाळ -१०.०, महाबळेश्वर -१०.४, जालना -११.६, बुलडाणा -११.६, अमरावती -११.७, उस्मानाबाद -१२, अकोला -१२, वर्धा १२.२, सोलापूर १२.७ अंश.

बातम्या आणखी आहेत...