आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:दारुड्या बापाने केला पोटच्या मुलीवर अत्याचार ; बापाला खुलताबाद पोलिसांनी पकडले

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील एका गावात बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घटना घडली आहे. दारुड्या बापाने नशेत आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. अत्याचार करून पळून जात असलेल्या बापाला खुलताबाद पोलिसांनी पकडले असून संतोष खंड्ड सोनवणे असे आरोपी दारुड्या बापाचे नाव आहे. आरोपीवर बलात्कारासह पोक्सोअंतर्गत खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दारुड्या बापाला अटक करण्यात आली आहे. ३५ वर्षीय आरोपीला चार मुली असून एक मुलगा अशी एकूण पाच मुले आहेत. आरोपी हा वीटभट्टी कामगार असून तो पत्नी-मुलांसह कागजीपुरा येथील एका वीटभट्टीवर विटा थापण्याचे काम करत होता. वीटभट्टीचे सध्या काम बंद झाले असल्याने आरोपी हा सध्या ट्रॅक्टरवर माती काम करत आहे. आरोपीने बुधवार रोजी रात्री दररोज प्रमाणे दारू पिऊन घेतली व पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याचा प्लॅन आखला. त्याने १६ वर्षीय मुलीला वीटभट्टीवर सामान आणण्यासाठी नेण्याचा बहाणा करत बरोबर नेले. तेथे नेऊन मुलीला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला कागजीपुरा येथे नातेवाइकांकडे सोडले व तो तेथून निघून गेला. तो गावात एका समाज मंदिरात जाऊन झोपला. मुलीने सकाळी उठून नातेवाइकांना घडलेला प्रकार सांगितला. नातेवाइकांनी त्या नराधाम बापाचा शोध सुरू करत पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून त्याच्यावर बलात्कारासह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून गजाआड केले. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक भुजंग हातमोडे व पिंक पथकाचे हेडकॉन्स्टेबल मनोहर पुंगळे, अमोल गायकवाड, योगेश ताठे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...