आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला घराबाहेर हाकलले:एक वर्षाची मुलगी रडली की घराबाहेर फेकून द्यायचा दारुडा बाप; नराधमाच्या तावडीतून दामिनींनी साेडवले

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विद्यापीठ परिसरातील बांधकाम मजुरांनी तक्रार केल्यानंतर पाेलिसांच्या पुढाकारातून मुलगी बचावली

चोवीस तास नशेत तर्र राहणाऱ्या एका नराधमाने व्यसनाला विराेध करते म्हणून पत्नीला घरातून हाकलून दिले हाेते. तिला एक वर्षाच्या मुलीला साेबत नेऊ दिले नाही. नंतर चिमुकलीला घरातच कोंडून जन्म दिलेला बाप दिवसभर दारू पिण्यासाठी जायचा. रात्री ताे घरी आला की भुकेने व्याकूळ झालेली चिमुकली टाहो फोडायची. परंतु शुद्ध नसलेला तिचा बाप मुलीला उचलून चेंडूप्रमाणे घराबाहेर फेकून द्यायचा. ही गोष्ट पोलिसांना कळताच दामिनी पथकाने धाव घेत मंगळवारी चिमुकलीला ताब्यात घेत महिलासेवा गृहात दाखल केले. त्यामुळे तिला आधार मिळाला.

विद्यापीठातील ललित कल विभागापासून काही अंतरावर एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सकाळी तेथे काम करणाऱ्या मजुरांना जवळील एका इमारतीमधून बाळाचा रडण्याचा आवाज आला. परंतु त्यांनी आधी दुर्लक्ष केले. दोन-अडीच तास होऊनही बाळाचे रडणे कमी होत नसल्याचे पाहून एका पेंटरने जवळ जाऊन पाहिले असता अक्षरश: घाणीमध्ये एक चिमुकली रडत बसल्याचे दिसले. त्याने तत्काळ पाेलिसांच्या कंट्रोल रूमला फाेन केला. बेगमपुरा बीट मार्शल गणेश गायकवाड सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले असता त्यांना मुलगी तिथे असल्याचे दिसले. त्यांनी दामिनी पथकाला पाचारण केेले. दामिनी पथकाच्या निर्मला निंभोरे, प्रियंका सरसांडे, श्रृती नांदेडकर, सुमन पवार यांनी घटनास्थळी धाव घेत चिमुकलीला जवळ घेतले. नंतर आसपासच्या मजुरांच्या मदतीने तिच्या वडिलांचा शोध घेत घरी नेले. तेव्हा देखील नशेत असलेल्या तिच्या बापाला काहीच बाेलता येत नव्हते. अखेर पथकाने चिमुकलीला साेबत नेले.

वाद झाल्याने पत्नी माहेरी कोल्हापूरला
सुरक्षा रक्षकाचे संतोष (नाव बदललेले आहे) हा ३० वर्षीय तरुण या चिमुकलीचा बाप आहे. पत्नी दारूला विराेध करायची म्हणून दाेन महिन्यांपूर्वी त्याने तिला घरातून हाकलून दिले. ती माहेरी कोल्हापूरला गेली. संतोषने मुलीला नेऊ दिले नाही. आईविना राहणाऱ्या या चिमकुलीशी बाप दाेन महिन्यांपासून निष्ठूर वागायचा. राेज तिला उपाशीच ठेवायचा. रडायला लागली की मारहाण करून घराबाहेर फेकून द्यायचा. पुन्हा शुद्ध आली की घरात आणायचा. यात मुलीच्या चेहऱ्याला, नाकाला इजा झाली हाेती. हे कळाल्यावर पाेलिसांनी वडिलांकडे न ठेवण्याचा निर्णय घेतला. घाटीत तपासणी करून तिला बाल कल्याण समितीकडे नेले. नंतर भारतीय महिला सेवागृहाकडे चिमुकलीला सुपूर्द करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...