आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागीतगुुंजन’सारखे उपक्रम राबवण्याची आज खरी गरज आहे. प्रत्येक जण उत्कृष्ट कलाकार होऊ शकत नसला तरी तो संगीत रसिक होऊ शकेल, असे मत गायक राजेश सरकटे यांनी व्यक्त केले. देवगिरी महाविद्यालयात बुधवारी (१ फेब्रुवारी) “देवगिरी गीतगुंजन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात ‘आई भवानी’, ‘लल्लाटी भंडार’, ‘मल्हारवारी’ अशा भक्तिगीतांसह हिंदी-मराठी चित्रपटांतील गीते सादर झाली. प्रारंभी ‘गजानना श्री गणराया’ या गीतावर मधुरा वाघ हिने कथ्थक नृत्य सादर केले. नंदिनी महाजन हिने ‘बाबूजी धीरे चलना,’ डॉ. तुकाराम वांढरे यांनी ‘नीले निले अंबर पर,’ सिद्धी पाठक आणि ऋषिकेश कमलाकार यांनी ‘इक प्यार का नगमा है’ तर वैष्णवी सोळंके, यश वाघ यांनी ‘सैराट झालं जी’ ही गाणी सादर केली. ‘निसर्गराजा ऐक सांगतो’, ‘परबत के उस पार’ ‘हिंदोस्ता हमारा,’ ‘सुनो गौर से,’ ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ अशी विविध गाणी सादर झाली. दिव्यानीने ‘राया इष्काच्या झुल्यात झुलवा’ या लावणीवर नृत्य सादर केले. व्यासपीठावर प्राचार्य अशोक तेजनकर, डॉ. दिलीप खैरनार, डॉ. अनिल आर्दड, डॉ. अपर्णा तावरे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.