आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:वसमत पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या गळ्यातील गंठण पळविले; वसमत ते नांदेड मार्गावरील घटना

हिंगोली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वसमत पोलिसांसोबतच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या दुचाकीस्वाराचा शोध सुरु केला आहे.

वसमत ते नांदेड मार्गावर वसमत पासून काही अंतरावर दुचाकी वाहनावर घरी जाणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या गळ्यातील सोन्याचे गंठण दुचाकीस्वाराने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 6 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. वसमत पोलिसांसोबतच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या दुचाकीस्वाराचा शोध सुरु केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या अंबीका पिटलेवाड ह्या बुधावरी ता. 5 रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकी वाहनांवर नांदेडरोडकडे जात होत्या. यावेळी एका दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील 46 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण बळबजरीने हिसकाऊन पळ काढला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पिटलेवाड ह्या घाबरून गेल्या. त्यांनी वसमत शहर पोलिस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची माहिती दिली.

त्यानंतर वसमत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गुरमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील, उपनिरीक्षक खार्डे, जमादार प्रशांत मुंडे, मगरे यांच्या पथकाने त्या दुचाकीस्वाराचा शोध सुरु केला. मात्र रात्री उशीरा त्याची माहिती मिळाली नाही. त्यानंतर आज पहाटे पिटलेवाड यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत शहर पोलिस ठाण्याच्या पथकासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, जमादार बालाजी बोके, संभाजी लकुळे, भगवान आडे, विलास सोनवणे याच्या पथकाने वसमत परिसरात जाऊन त्या दुचाकीस्वाराचा शोध घेण्यास सुरवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...