आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेकटा रोडवरील गट नंबर ९८२/९८३ मध्ये एक एकर क्षेत्रातील एका अल्फा वेअर हाऊसच्या मोठ्या गोडाऊनला शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता भीषण आग लागली. यात स्क्रॅप जळून लाखोंचे नुकसान झाले. मात्र, आगीचे कारण अद्याप समजले नाही. अग्निशमन दलाचे जवान व खासगी टँकरच्या मदतीने आग विझविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. घटनेची माहिती मिळताच बिडकीन ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे, पोलिस उपनिरीक्षक महेश घुगे, सहायक फौजदार तानगडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. ही आग जवळील शेतवस्ती व रोडलगतच्या हॉटेल-ढाब्यांना लागू नये म्हणून परिसरातील शेतकऱ्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. हे गोडाऊन रस्त्यालगतच असल्याने पोलिसांनी रोडवरील वाहतूक सुरळीत केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.