आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बीड शहरापासून बारा किलाेमीटर अंतरावर असलेल्या पाली येथे एचआयव्ही बाधित मुलांसाठी आनंदवन इन्फंट इंडिया संस्था आहे. या ठिकाणी सोमवार (दि. 7) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मुलांना डोंगरातून हरीण व ससे पळताना दिसून आले. त्यामुळे मुलांनी त्यांच्या धावण्याच्या दिशेकडून पहाताच आकाशात धुराचे लोट दिसून आले. त्यानंतर तात्काळ आग लागल्याची माहिती मुलांनी बागरजे सरांना दिली. बारगजे दाम्पत्यांसह 65 मुलांनी कळशी व बकेटने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. तसेच अग्नीशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून आगीच्या विळख्यात असलेल्या पाचशे ते आठशे फुटापर्यंत डोंगरावरील क्षेत्र सुरक्षित केले.
पाली (ता. बीड ) येथील डोंगरावर आनंदवन इन्फट इंडिया संस्था आहे. मागील 14 वर्षांपासून आनंदवन येथे एचआयव्ही बाधित मुला-मुलींना आश्रय दिला जातो. सध्या येथे 75 मुले-मुली वास्तव्यास आहेत. दत्ता बारगजे व संध्या बागरगजे या दांपत्यासह आठजण त्या मुलांची देखबाल करतात. आनंदवन असलेला डोंगर उगडा-बोडगा असल्याने गवत व झाडेझुडपी येथे आहेत. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये गवत वाळलेल असते. कधी डोंगरावरुन गेलेल्या महावितरणच्या तारांमध्ये शाॅटस्क्रीट तर कधी ट्रक चालक शौच्छास बसल्यानंतर बीडी-सिगारेट टाकून देतात व आग वाढत जाते. परिणामी गायरानमध्ये आलेले मोठे वाळलेले गवत जळून खाक होते तसेच वन विभागासह विविध शासकिय विभाग, विविध महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा याेजना पथक, सेवावृत्तीने केलेले वृक्षारोपन आगीत झळून खाक होते. आनंदवन येथे चिमुकल्याच्या आरोग्यासाठी तयार करण्यात आलेले वन औषधी,बगीचा व त्यातील ठिबक साहित्य जळून गेलेल आहेत, अशी माहिती इन्फट इंडियाचे संचालक दत्ता बारगजे यांनी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना दिली.
अगीच्या घटना अधीक; अग्नीशमन यंत्रणेची गरज
2017-18,19 व 20 या तीनही वर्षी उन्हाळ्याच्या दरम्यान डोंगराला आग लागली आहे. जीवनाशी संघर्ष करत जगणाऱ्या या चिमुकल्यांना आशा हानीपासून बचाव व्हावा म्हणून जिल्हाधिकारी, दानशुर व्यक्ती, सामाजिक संघटनांनी इन्फट इंडिया येथे अगीपासून सुरक्षा होण्यासाठी अग्नीशमन यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध करावी, असे आव्हानही बारगजे दांपत्याने ‘दिव्य मराठी’ शी बोलताना केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.