आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्दैवी:घराची भिंत कोसळून पाच महिन्यांचा मुलगा ठार

औरंगाबाद10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनपाने धोकादायक घरांचा सर्व्हे न केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे.

सोमवारी दुपारी झालेल्या पावसामुळे मातीच्या घराची भिंत कोसळून पाच महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १५) दुपारी पावणेचार वाजता हर्सूल भागात घडली. मनपाने धोकादायक घरांचा सर्व्हे न केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. पीयूष विलास म्हस्के (५ महिने) असे मृत बाळाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विलास म्हस्के हे कुटुंबीयांसह हर्सूल भागातील एका विटा-मातीच्या घरात किरायाने राहतात. आठवडाभरापासून शहरात दररोज पाऊस पडत आहे. पावसाचे प्रमाणही जास्त असल्याने त्यांच्या घराच्या मातीची भिंत पूर्णपणे भिजली होती. सोमवारी दुपारी पावणेचार वाजता शहरात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यात एक भिंत कोसळल्याने विलास म्हस्के त्यांचा पाच महिन्यांचा मुलगा पीयूष त्याखाली दबले. स्थानिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धावले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने विलास यांना सुखरूप बाहेर काढले. मात्र ढिगाऱ्याखाली दबून पीयूषचा जीव गेला. त्याला बाहेर काढून टीव्ही सेंटर परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला घाटीत हलवण्यास सांगितले. घाटीतील डॉक्टरांनी तपासून पीयूषला मृत घोषित केले. या प्रकरणी हर्सूल ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...