आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी मेळा:महाअॅग्रो कृषी प्रदर्शनात अन्नधान्य खरेदीसोबत खवय्यांसाठी खाद्ययात्रा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांनी पिकवलेला माल ग्राहकांपर्यंत पोहोचावा, शेतकऱ्यांना तज्ज्ञांमार्फत नवनवे तंत्रज्ञान-वाणाची माहिती मिळावी या उद्देशाने १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान पैठण रोडवरील कृषी तंत्र विद्यालय व केव्हीकेच्या प्रांगणात राज्यस्तरीय महाअॅग्रो कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडा शेती हाय्य मंडळ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, मराठवाडा चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर, राज्य व केंद्रीय कृषी विभाग व सियाम यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती मुख्य समन्वयक अॅड. वसंत देशमुख यांनी दिली.

१७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद‌्घाटन होईल. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री, शेती अवजारे व यंत्रे बियाणे, खत, कीटकनाशके, इरिगेशन कंपन्यांसह शेतीशी संबंधित विविध मोठया कंपन्यांचा या प्रदर्शनात सहभाग असेल. शेतकऱ्यांसाठी फळबागा आणि इतर पिकांची लागवड तंत्रज्ञान, शेतीमाल विपणन आणि परदेशी बाजारपेठ, प्रक्रिया उद्योग आणि हवामानातील बदलांचा शेतीवरील परिणाम आदी विषयावर तज्ज्ञांची चर्चासत्रेही आयोजित केली आहेत.

या प्रदर्शनात दोनशेहून अधिक स्टॉल्स असतील. बियाणे, लागवड तंत्रज्ञान, शेतमाल विपणन, शेतीपूरक उद्योग यासह आधुनिक तंत्रज्ञानाचा शेती आणि शेतीपूरक उद्योगांमध्ये उपयोग कृषी उत्पादने साठवणूक, नाबार्डच्या माध्यमातून कृषी बँकिंग, उत्पादन दुप्पट करण्याकरिता शासनाने आखलेल्या विविध योजनांची माहिती, या विषयांशी निगडित विविध कंपन्यांच्या स्टॉल्सचा यात समावेश आहे. विविध पिकांची लागवड ते काढणीपर्यंतचे तंत्रज्ञानाची माहितीही दिली जाणार आहे. पत्रकार परिषदेला सिमाचे शिवप्रसाद जाजू, प्राचार्य के. टी. जाधव, मराठवाडा शेती साहाय्य्य मंडळाचे अजय गांधी, मॅन्ग्रोचे संचालक सुशील बलदवा, शेतकरी रंगनाथ जाधव यांची उपस्थिती होती.

शेतकरी ते ग्राहक थेट संबंध मध्य‌स्थांची साखळी कमी करून शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना माल विकता यावा या उद्देशाने हे प्रदर्शन भरवले जात आहे. या वर्षीही शेती बाजारमध्ये विविध बचत गट, प्रगतिशील शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी कंपन्यांचे ५० ते ६० स्टॉल आहेत. त्यांनी उत्पादित केलेली विविध कृषी उत्पादने, सेंद्रिय शेतीतून उत्पादित भाज्या, फळे, धान्य अशा शेकडो वस्तूंची थेट विक्री या ठिकाणी होईल.

गव्हाच्या खिरीपासून ते तांबड्या-पिवळ्या रश्श्यापर्यंतची पर्वणी
खवय्यांना विविध पदार्थ खाण्याची संधी यातून मिळेल. मासवडी, थालीपीठ, गव्हाची खीर, कुल्फी, मटक्यातील गावरान आणि ब्रॉयलर चिकन, तांबडा आणि पिवळा रस्सा, खेकडा, मासे, कोंबडी वडे, चिकन बिर्याणी, व्हेज-नॉनव्हेज थाळी, भरीत, पिठलं भाकरी, खान्देशातील मांडे, भरीत, कळण्याची भाकरी, हुरडा, आदी स्टॉलही असणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...