आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Marathwada Mukti Sangram Day | Atul Save Big Annousment | A Fund Of 80 Crores Will Be Received For The Marathwada Liberation War; Will Bring More Development Funds | Marathi News

सहकारमंत्री सावेंची माहिती:मराठवाडा मुक्तिसंग्रामासाठी 80 कोटींचा निधी मिळणारच; जास्त विकास निधी आणणार

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने ७५ ते ८० कोटींच्या विकासकामांचा प्रस्ताव विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी राज्य सरकारकडे पाठवला होता. ठाकरे सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला, पण सत्तांतर झाल्यानंतर निधी मंजूर होण्यात अडचणी येत होत्या. ‘दिव्य मराठी’ने हा प्रश्न मांडला होता. दरम्यान, या अमृतमहोत्सवानिमित्त सरकार लवकरच ८० कोटींचा निधी मंजूर करेल, त्याची सर्व प्रक्रिया झाली आहे, अशी घोषणा सहकारमंत्री अतुल सावे यांनी केली.

पत्रकार परिषदेत याबाबत प्रश्न विचारल्यानंतर सावेंनी सांगितले, मुक्तिसंग्रामच्या निधीसाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. ८० कोटींचा निधी मंजूर होणार आहे. पैठणमध्ये सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या सभेत शक्तिप्रदर्शन करणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात भरपूर विकासकामे व्हावीत, निधी मिळावा यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे सावे व रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले. शिरसाट शांत : मंत्री भुमरे बोलत असताना सावे यांनी माइक हातात घेत ते उत्तरे देऊ लागले. या वेळी पत्रकारांनी एकनाथ शिंदेंचा माइक फडणवीस यांनी ओढून घेतल्याची आठवण करून दिली. त्यावर सावे म्हणाले, मी भुमरेंची परवानगी घेऊनच माइक घेतला. भुमरेही म्हणाले, मीच त्यांना विनंती केली. विनंती करूनही आमदार संजय शिरसाट बोलले नाहीत.

आठ जिल्ह्यांत ध्वजस्तंभ, स्मृती भवन उभारणार

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत ५० ठिकाणी ध्वजस्तंभ उभारले जातील. त्याच्या बाजूला छोटेसे गार्डन असेल. जिल्ह्यात स्मृती भवन उभारणीसह इतर कामांचा प्रस्ताव सरकार मंजूर करणार असल्याचे सावे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...