आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या औरंगाबाद येथील देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट स्टडीज अर्थात डीआयटीएमएस कॉलेजला राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषदेचा (नॅक) ‘ए’ ग्रेड प्राप्त झाला आहे. पहिल्याच ‘सायकल’मध्ये ‘डीआयटीएमएस’ महाविद्यालयाने 3.2 गुण मिळवत हा ग्रेड प्राप्त केला.
राष्ट्रीय मुल्यांकन आणि प्रत्यायन परिषद (नॅक), बंगळुरू ही उच्च शिक्षणाची गुणवत्ता तपासणारी दर्जेदार आणि अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून देशपातळीवर उच्च शिक्षण देणार्या महाविद्यालयांची गुणवत्ता तपासली जाते. गेल्या 25 वर्षांपासून देशातील विविध महाविद्यालयांची गुणवत्ता तपासण्याचे कार्य ही संस्था करत आली आहे.
समितीकडून पाहणी
डॉ. केशव शर्मा (हिमाचलप्रदेश), डॉ.डेव्हीड पिटर (कोचिन), डॉ.रमेश आगडी (गुलबर्गा) या ‘नॅक’च्या तज्ज्ञ समितीने 3 व 4 नोव्हेंबर रोजी देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट स्टडीज (डीआयटीएमएस) महाविद्यालयास भेट दिली होती. महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेची पाहणी समितीने केली होती. पाहणीनंतर ‘नॅक’ने नुकतेच गुणांकन जाहीर केले असून त्यात ‘डीआयटीएमएस’ महाविद्यालयास पहिल्याच ‘सायकल’मध्ये ‘A’ हा ‘ग्रेड’ मिळाला आहे.
महाविद्यालयाचा CGPA 3.2 एवढा आला असल्याचे डॉ.अनुया चांदोरकर यांनी सांगितले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सोळंके, सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, उपाध्यक्ष सलीम शेख, कोषाध्यक्ष डॉ. अविनाश येळीकर आदींनी कौतुक केले आहे. आयक्यूएसी समन्यवय डॉ.पल्लवी भालेराव, डॉ.उमेश मालपाणी, प्रा.राजेंद्र मोतिंगे, प्रा.किरण मारवाडे यांनी नॅक मुल्यांकनासाठी विशेष प्रयत्न केले.
अभ्यासक्रमांना ४ पैकी ३.७ गुण
महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी ४ पैकी ३.७ गुण मिळाले आहेत.
१.अध्यापन, अध्ययन, मूल्यांकन
२.संशोधन, नवनिर्मिती आणि विस्तार कार्य
३ .मूलभुत सुविधा व शैक्षणिक सोयी
४.विद्यार्थी साह्य व प्रगती
५. प्रशासकीय नेतृत्व व व्यवस्थापन
७. संस्थात्मक मूल्य व नाविण्यपूर्ण उपक्रम आदी कोर्स कॉलेजमध्ये शिकवले जातात. देवगिरी कॉलेजमध्ये शिकवले जाणारे कोर्स लोकाभिमुख असून अभ्यासक्रमांची पद्धत चांगली असल्याचे नॅक समितीने म्हटले आहे.
..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.