आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनाहद ओ’कोनोर
हृदयरोग हे अमेरिकेसह भारतातील पुरुष आणि महिलांच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे. स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक वेळा हृदयविकाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात असे अभ्यास सांगतो. स्त्रियादेखील मदत घेण्यास कचरतात. कारण त्यांच्यात पुरुषांपेक्षा सौम्य लक्षणे असतात. म्हणून जेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतात तेव्हा डॉक्टर त्यांच्या लक्षणांना कमी लेखतात किंवा उपचारांना उशीर करतात. खरं तर पुरुष/स्त्रियांमध्ये हृदयविकाराचे एक सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणे किंवा अस्वस्थता.
परंतु अनेक स्त्रिया हृदयाच्या समस्यांशी निगडित श्वास घेण्यास त्रास होणे, आजारी वाटणे, थकवा येणे, जबडा-पाठदुखी अशी लक्षणे सांगतात की त्याचा हृदयाच्या समस्येशी संबंध लावणे कठीण होते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अहवालानुसार ज्या स्त्रियांना छातीत दुखत नाही त्यांना हृदयविकाराचा झटका घातक असतो. कारण याचा अर्थ रुग्ण व डॉक्टर दोघांनाही समस्या ओळखण्यास जास्त वेळ लागतो. हा त्यांचा मानसिक रोग असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. येल-न्यू हेवन रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अलेक्झांड्रा लॅन्स्की म्हणतात, ‘एक महिला जबडा दुखण्याची तक्रार घेऊन अनेक डॉक्टरांकडे गेली. सर्व दंतवैद्याकडे पाठवले. डेंटिस्टने तिच्या दोन दाढा काढल्या तरीही वेदना कमी झाल्या नाहीत म्हणून ती माझ्याकडे आली. तपासणीत वेदना हृदयाशी संबंधित असल्याचे समोर आले. महिलेची बायपास शस्त्रक्रिया झाल्यावर जबड्याचे दुखणे निघून गेले. महिलांना हृदयविकाराबद्दल जागरूक करण्यासाठी अमेरिकेत मोहीम सुरू आहे. असे म्हटले जाते की घाम येणे, चक्कर येणे किंवा असामान्य थकवा येणे ही हृदयविकाराची लक्षणे असू शकतात. जर्नल थेरप्युटिक्स अँड क्लिनिकल रिस्क मॅनेजमेंटच्या अभ्यासानुसार, ३६% पुरुषांच्या तुलनेत ६२ % महिलांना छातीत दुखत नाही.
३५ ते ५४ वयोगटातील महिलांमध्ये उच्च रक्तदाब, लठ्ठपणाचा धोका वाढतो
कार्डिओलॉजिस्ट डॉ. जॅकलिन टॅमिस-हॉलंड म्हणतात, ‘सिनेमांप्रमाणे छातीत aदुखणे हे हृदयविकाराचे सर्वात मोठे लक्षण आहे असे लोकांना वाटते. पण तसे नाही. पुरुषांपेक्षा स्त्रिया स्वतःला हृदयविकाराचा धोका जास्त मानत नाहीत. मात्र, तरुण वयातील महिलाही त्याला बळी पडू लागल्या आहेत. उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा ३५ ते ५४ वयोगटातील महिलांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या जोखमीशी संबंधित आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.