आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिडको एन-३ परिसरातील शिवाजी अवधूत चव्हाण (६८, रा. प्लॉट नं. १७०, अजयदीप कॉम्प्लेक्सजवळ) यांचे घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीच्या गुन्हे शाखेच्या पथकाने गडचिरोली, चंद्रपुरातून मुसक्या आवळल्या. यात व्यंकटी रामा गोडमारे (३८, रा. विर्शीवार्ड, देसाईगंज, जि. गडचिरोली), लिग्नन्ना शालिक मन्नेकर (३०), दारासिंग हिरा बदकल (२९, दोघेही रा. वरोरा, जि. चंद्रपूर) यांचा समावेश असून त्यांचे अन्य दोन साथीदार चंदू बदकल, संगीता यांच्यासह मिळून घरफोडी केल्याची कबुली त्यांनी दिली. चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या नंदकिशोर बाबूराव गजापुरे (५०, रा. देसाईगंज, गडचिरोली) यालादेखील पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून ८ लाख २ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. विशेष म्हणजे हे चोरटे शहरात फिरून केसांच्या बदल्यात भांडे देण्याचा बहाणा करत घरांची रेकी करून घरफोड्या करण्याच्या तयारीत असतानाच त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. चव्हाण हे कंत्राटदार असून ते २७ नोव्हेंबरला कुटुंबीयांसह कोल्हापूरला गेले हाेते. ही संधी साधून चाेरट्यांनी त्यांच्या बंगल्यात प्रवेश करत चोरी केली. हा प्रकार १ डिसेंबर रोजी ते परतल्यावर समाेर आला. गुन्हे शाखेने शहरातील १८० सीसीटीव्ही तपासून चोरांचा पंचवटी चौकापर्यंत मार्ग काढला. यात चोरटे रिक्षाने रेल्वेस्टेशनपर्यंत गेल्याचे दिसले.
तसेच २८ नोव्हेंबरला पाचही जण रेल्वेस्टेशनवर झोपल्याचे निष्पन्न झाले. तेथून ते पंचवटी चौकात येऊन ट्रॅव्हल्सने गडचिरोली, चंद्रपूरकडे गेल्याचे समाेर आले. गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांचे पथक गडचिरोली व चंद्रपूरला रवाना झाले. देसाईगंज येथून व्यंकटी गोडमारेला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने अन्य ४ साथीदारांची नावे सांगितली. ही कारवाई आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मनोज शिंदे, महांडुळे, संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, गजानन मांटे, भगवान शिलोटे, संजय नंद, संदीप तायडे, विशाल पाटील, राजाराम डाखुरे, अजय चौधरी, राहुल खरात, अमोल शिंदे, विलास मुठे, रवी खरात, नितीन देशमुख, धनंजय सानप यांनी केली.
१ लाख ७० हजार रोख पळवले चाेरट्यांनी ७ तोळे सोन्याच्या ६ बांगड्या, ५ ग्रॅम डायमंड रिंग, ३ ग्रॅमचे मंगळसूत्र, ५ ग्रॅमची अंगठी, चांदीची २ ताटे, ३ वाट्या, करंडा, समई, चांदीचे लक्ष्मी यंत्र आणि एक लाख ७० हजार रुपये राेख असा एकूण ८ लाख २ हजार ४२० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.