आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:हिंगोली शहरातील भाजी मंडईमध्ये दुकानांना भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसानीचा अंदाज

हिंगोली7 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील भाजी मंडई भागामध्ये रविवारी तारीख १७ रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चार ते पाच दुकानांना लागलेल्या भीषण आगीमध्ये तीन दुकाने जळून भस्मसात झाली आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या आगीची झळ परिसरातील दुकानांना बसली आहे. हिंगोली व कळमनुरी च्या अग्निशामक दलाच्या पथकाने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

हिंगोली शहरातील भाजी मंडई भागामध्ये रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका दुकानातून अचानक धूर निघू लागला. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. आगीचा भडका उडाल्याने या आगीची झळ परिसरातील इतर दुकानांना बसली. आग लागल्याचे वृत्त समजतात हिंगोली पालिकेची अग्निशामक दल तसेच कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. विशेष म्हणजे पालिकेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम अर्धवट सोडून घटनास्थळी धाव घेतली. मुख्याधिकारी कुरवाडे, कर्मचारी बाळू बांगर यांच्यासह अग्निशामक दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर कळमनुरी येथील अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. आगीच्या घटनेनंतर घटनास्थळी मोठा जमाव एकत्र आला. या जमावाने परिसरातील दुकानातील साहित्य काढून टाकण्यास मदत केली. त्यामुळे इतर दुकानांचे मोठे नुकसान झाले नाही.

या आगीमध्ये रफिक अडत दुकान तसेच जमील तांबोली व कलीम तांबोळी यांच्या कटलरी व स्टेशनरी तसेच मसाला साहित्याचे हे नुकसान झाले. यातून तीन दुकानाचे मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दुकानात परिसरातील दुकानात मला बसली मात्र त्या ठिकाणी मोठे नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...