आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड जिल्ह्यातील एका ३५ वर्षीय तरुणाच्या दोन्ही किडन्या वर्षभरापूर्वी निकामी झाल्या होत्या. त्यामुळे त्याचे नियमित डायलिसिस सुरू होते. या रुग्णास त्याच्या आईने किडनी देण्याचे ठरवले. किडनी प्रत्यारोपणामध्ये किडनीदात्याची एक किडनी काढून रुग्णात प्रत्यारोपित केली जाते. या तरुणाच्या किडनीदात्या आईची शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे झाली. किडनी योनीमार्गातून शरीराच्या बाहेर काढण्यात आली. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती कमलनयन बजाज रुग्णालयातील किडनीविकार शल्यचिकित्सक डॉ. आदित्य येळीकर यांनी दिली.
अशा शस्त्रक्रियेमुळे किडनीदात्याच्या शरीरावर कोणतीही मोठी जखम झाली नाही, मोठे टाके टाळता आले. किडनीदात्याने चोवीस तासांत आहार घेणे चालू केले. शिवाय रुग्णालयातून ४८ तासांत सुटी देण्यात आली. नंतर तरुणावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रकिया डॉ. येळीकर यांच्यासह डॉ. शरद सोमाणी, डॉ. समीर महाजन, भूलतज्ज्ञ डॉ. बालाजी आसेगावकर यांनी पार पाडली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचे डायलिसिस होते बंद किडनी निकामी झाल्यानंतर सर्वोत्तम उपचार म्हणजे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया. किडनी प्रत्यारोपणामुळे रुग्णाची सुधारित जीवनशैली, आहार वाढणे, वजन नियमित होणे, डायलिसिस बंद होते. डायलिसिसमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका, सतत रुग्णालयात जाण्याच्या त्रासातून मुक्तता होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.