आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजित शिवस्मारक:पिसादेवीत शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा बसवणार ; मिरवणूक व वाहन रॅली काढणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पिसादेवी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात येणार आहे. रविवारी चिकलठाणा येथे या पुतळ्याचे आगमन होणार असून यानिमित्त शहर ते पिसादेवी येथील शिवस्मारकाच्या नियोजित जागेपर्यंत दुपारी २ वाजता मिरवणूक व वाहन रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती सरपंच राजेश काळे, माजी सरपंच ताराचंद काळे यांनी दिली. मागील अनेक महिन्यांपासून पिसादेवी येथील जुन्या शिवस्मारकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते.

सध्या हे काम अंतिम टप्प्यात असून शिवजयंतीच्या मुहूर्तावर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात येणार आहे. या निमित्ताने रविवारी दुपारी २ वाजता चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये या पुतळ्याचे आगमन होत आहे. आयडिया कॉल सेंटर येेथे या अश्वारूढ पुतळ्याचे माजी आ. डॉ.कल्याण काळे, माजी जि.प. सभापती रघुनाथ काळे यांच्या उपस्थितीत भव्य स्वागत करून पुढे नारेगाव, गरवारे मैदान मिरवणूक काढण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...