आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलावर अत्याचार:हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे गतीमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य, फुले देण्याच्या बहाण्याने शेतात नेले होते; आरोपी पोलिसांच्या तावडीत

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे शेतात फुले देण्याचे अमिष दाखवून एका अल्पवयीन गतीमंद मुलासोबत एका व्यक्तीने अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीस शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथील एक अल्पवयीन गतीमंद मुलगा इतर मित्रांसोबत बुधवारी (15 सप्टेंबर) दुपारी गावालगत असलेल्या शेतात फुले तोडण्यासाठी गेला होता.

शेतात असलेल्या प्रकाश जाधव याने त्या गतिमंद व अल्पवयीन मुलास तिकडे जास्त फुले आहेत, तुला फुले देतो असे अमिष दाखवून तुरीच्या शेतात नेले. त्यानंतर त्या ठिकाणी त्या मुलासोबत अनैसर्गिककृत्य केले. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर प्रकाश याने तेथून पळ काढला. तर तो गतीमंद मुलगा घरी आल्यानंतर त्याला त्रास होण्यास सुरवात झाली. मात्र त्याला नेमका प्रकार घरी सांगता येत नव्हता. मात्र त्रास वाढल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याला विश्वासात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने घडलेला प्रकार सांगितला.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या त्या मुलाच्या कुटुंबियांनी शुक्रवारी ता. 17 सायंकाळी गोरेगाव पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी प्रकाश जाधव याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपाधिक्षक विवेकानंद वाखारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील, उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर शुक्रवारी ता. 17 रात्री प्रकाश यास अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...