आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक‎:संपाबाबत उद्या‎ मंत्रालयात बैठक‎

छत्रपती संभाजीनगर‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या‎ मागण्यांबाबत येत्या सोमवारी (१३‎ मार्च) मुख्य सचिवांच्या दालनात‎ कर्मचारी संघटनेसोबत सकाळी ११‎ वाजता बैठक आयोजित करण्यात‎ आली आहे. ही बैठक मुख्य‎ सचिवांच्या अध्यक्षतेखाली होणार‎ आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी येत्या १४‎ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा‎ इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर‎ ही बैठक होत आहे.‎

बैठकीसंदर्भात अपर सचिव अ.‎ म. चेमटे यांनी मंत्रालयातील गृह,‎ सामान्य प्रशासन, अर्थ, ग्रामविकास‎ व पंचायत राज, नगर विकास,‎ जलसंपदा, शालेय शिक्षण,‎ सार्वजनिक आरोग्य, महिला व‎ बालविकास, विधी व न्याय,‎ सार्वजनिक बांधकाम या विभागांना‎ पत्र पाठवले आहे. कर्मचारी संघटनेने‎ मागण्यांसंदर्भात निवेदन दिले होते. या‎ मागण्यांबाबत वस्तुनिष्ठ माहिती‎ घेऊन उपस्थित राहावे, असे पत्रात‎ म्हटले आहे. सरकारी, निमसरकारी,‎ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी‎ समन्वय समितीच्या निमंत्रकांनाही‎ बैठकीचे पत्र दिले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...