आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशभरात आरोग्य क्षेत्रातल्या इन्शुरन्स सेक्टर बाबत आयएमएच्या वतीने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्याकडे तक्रारी करण्यात आले आहेत यामध्ये हेल्थ सेक्टरमधील पॅकेज संदर्भात वेगवेगळ्या स्वरूपात रुग्णांकडून प्रेमियम वाढवून घेतला जातो.
मात्र, इन्शुरन्स कंपन्या ज्या सुविधा द्यायला हव्यात त्या देत नाहीत त्यामुळे हॉस्पिटलला देखील त्याचा फटका बसतो तसेच डॉक्टरांना देखील त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो त्यामुळे इन्शुरन्स कंपन्यांच्या मनमानी कारभारावर चाप आणावा, अशी मागणी आयएमच्या वतीने करण्यात आली आहे
आयएमएच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात आयएमएचे अध्यक्ष डॉक्टर यशवंत गाडे डॉक्टर अनुपम टाकळकर डॉक्टर उज्वला दहिफळे तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया चे चेअरमन डॉक्टर ए के रवी कुमार डॉक्टर दिनेश ठाकरे डॉक्टर राजीव अग्रवाल डॉक्टर अर्चना भांडेकर यांच्यासह विविध डॉक्टरांची उपस्थिती होती.
इन्शुरन्स कंपन्यांमुळे आरोग्य क्षेत्रात नाराजी
यावेळी डॉक्टर रवी कुमार यांनी इन्शुरन्स कंपन्यांमुळे आरोग्य क्षेत्रात नाव खराब होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आय आर डी ए वर या सर्वांचे नियमन करण्यासाठी आय एम ए चा प्रतिनिधी देखील असला पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली तर डॉ. पाटे म्हणाले की देशामध्ये वन नेशन वन ड्रग वन कॉस्ट असली पाहिजे. औषधांच्या वाढत्या किमती आणि त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे सामान्य माणसाच्या बाहेर औषधांच्या किमती जात आहेत त्यामुळे आरोग्य क्षेत्राची बदनामी होत आहे त्यामुळे या प्रकरणात इन्शुरन्स कंपन्या तसेच फार्मा कंपन्या यांच्यावर नियमन लावून सामान्य माणसाला आरोग्य सेवेचा लाभ कमी पैशात कसा मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मागणी यावेळी करण्यात आली
लवकरच बैठक घेणार याबाबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिव्य मराठी शी बोलताना सांगितले की या प्रकरणात आगामी महिन्याभरानंतर जूनच्या अखेरीस सचिव पातळीवर मी कंपन्या तसेच विविध अधिकाऱ्यांच्या माध्यमातून याबाबतचा आढावा घेणार आहे सामान्य माणसाला कमी पैशात सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करून तोडगा काढण्यात येणार असल्याचे कराड यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.