आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नात्याला काळिमा:अल्पवयीन मुलीवर सावत्र पिता आणि त्याच्या मित्राकडून लैंगिक अत्याचार

वैजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीवर नराधम सावत्र बाप आणि त्यांच्या साथीदाराने वर्षभरापासून लैंगिक अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला आहे. या कुकृत्याला जन्मदात्या आईने कोणताही विरोध न करता शारीरिक अत्याचाराकरिता अल्पवयीन मुलीला प्रवृत्त करण्याची भूमिका बजावल्यामुळे मातृत्वाच्या पवित्र नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार घडला.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी राजू लक्ष्मण सोळसे, सतीश कनगरे व पीडितेची आई तिघे रा.मोंढा मार्केट, वैजापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरात शिक्षणासाठी वसतिगृहात वास्तव्याला असलेली १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या पायाची शस्त्रक्रिया झाल्याने आईवडिलांकडे वर्षभरापासून आलेली होती. त्या दरम्यान तिच्या सावत्र पित्याने या मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार सुरू केला होता. तसेच त्याचा मित्र हा देखील या प्रकारात सहभागी होता.

मुलीच्या जन्मदात्या आईच्या संमतीने अल्पवयीन मुलीवर दोघांकडून लैंगिक शोषण करण्याचा प्रकार वर्षभरापासून सुरू होता. अत्याचाराला विरोध करणाऱ्या मुलीच्या गुप्तांगात या तिघांनी मिरची टाकण्याचा घृणास्पद प्रकार केला होता. पीडित मुलीने हा प्रकार तिच्या मावशीला सांगितल्या नंतर तिने अल्पवयीन मुलीला पोलिसांकडे नेऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. वैजापूर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७६ (३) ३, ४ बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील करीत आहेत. पोलिसांनी नराधम सावत्र बापास अटक केली आहे. तिची आई व बापाचा मित्र फरार आहेत.

बातम्या आणखी आहेत...